सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडून छत्रपती संभाजीनगरमधील विविध विकासकामांची पाहणी; कामे दर्जेदार व वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश
by Pranita Kurani छत्रपती संभाजीनगर, दि. २६ ऑक्टोबर : मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील विकासकामांना गती देण्याच्या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यादरम्यान शहरातील विविध विकासकामांची पाहणी करून कामांच्या सद्यःस्थितीचा आणि प्रगतीचा आढावा घेतला. यामध्ये डॉ. हेडगेवार हॉस्पिटलजवळ उभारण्यात येत असलेली सारथी इमारत, महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या फेज-२ अंतर्गत सुरू असलेली बांधकामे, नेहरूनगर येथील मा. उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींसाठीची निवासी इमारत, नगरनाका ते पडेगाव सहापदरी रस्ता तसेच वाळूज–पंढरपूर–कॅम्ब्रिज–शेंद्रा एम.आय.डी.सी. या प्रस्तावित उन्नत रस्त्याच्या प्रकल्पाचा समावेश होता. या पाहणीदरम्यान संबंधित प्रकल्पांची सद्यःस्थिती, बांधकामाचा दर्जा, कामांची गुणवत्ता आणि उर्वरित कामांच्या प्रगतीची माहिती घेतली. सर्व कामे निर्धारित वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यासाठी आवश्यक सूचना संबंधित अधिकारी व कंत्राटदारांना दिल्या. सारथी इमारतीच्या बांधकामाचा आढावा डॉ. हेडगेवार हॉ...






